मंडळी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज, १३ मे रोजी एकूण १६,६९४ क्विंटल तुरीची आवक झाली. या तुरीस सरासरी दर ६,६५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. बाजारात गज्जर, माहोरी, लाल, लोकल आणि पांढऱ्या प्रकारांतील तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली.
अमरावती बाजार समितीत लाल तुरीची सर्वाधिक म्हणजे ३,७२३ क्विंटल आवक नोंदली गेली. येथे तुरीस कमाल ७,२०० रुपये, किमान ६,९०० रुपये आणि सरासरी ७,०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. याउलट उमरगा बाजार समितीत केवळ २ क्विंटल लाल तुरीची आवक झाली. येथे कमाल दर ६,६०० रुपये, किमान ५,५०० रुपये आणि सरासरी दर ६,००० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही तुरीस समाधानकारक दर मिळाले. अकोला, लातूर, नांदूरा, कारंजा या प्रमुख बाजारांमध्ये तुरीस ७,००० ते ७,२३० रुपये प्रति क्विंटल पर्यंत कमाल दर मिळाला. दर्यापूरमध्ये माहोरी तूर ७,१४५ रुपयांपर्यंत विकली गेली.
पांढऱ्या तुरीलाही चांगला दर मिळत असून जालना, करमाळा आणि औराद शहाजानी या बाजारांमध्ये तिला ७,००० रुपये किंवा त्याहून अधिक दर मिळाला आहे. करमाळा बाजारात पांढऱ्या तुरीस ७,१२५ रुपये, तर औराद शहाजानी येथे ७,००१ रुपये प्रति क्विंटल कमाल दर नोंदवला गेला.
एकूणच तुरीच्या बाजारभावात स्थिरता दिसून येते असून काही ठिकाणी दर उच्च स्तरावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारभाव आणि आवक पाहून विक्रीचे योग्य नियोजन करावे.